आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामार्गावर लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अपघात राेखण्यासाठी दुपारी ३ ते पहाटे ४ या वेळेत वाहतूक पोलिसांचे गस्ती पथक कार्यरत राहणार आहे. हे पथक महामार्गावरील अवजड वाहनांना लेन कटिंग करताना वेग नियंत्रणासाठी फिरते मार्गदर्शन करणार आहे. या उपक्रमाने अपघात रोखण्यास मदत होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली.हे पथक विल्होळी ते आडगाव, दहावा मैल या २३ किमी मार्गावर असेल.
गस्ती पथकाचे नियोजन
महामार्गावर पहिल्या लेनमध्ये हलकी चारचाकी वाहने, दुसऱ्या व तिसऱ्या लेनमधून जड व अवजड वाहने तिसऱ्या लेनमधून इतर वाहनांच्या वेगासाठी पथकाकडून नियंत्रण ठेवणार आहे.
लेन सक्ती; वाहनचालकांना मार्गदर्शन
महामार्गावर वेगावर नियंत्रण न ठेवणे आणि लेन कटिंगमुळे अपघातात वाढ झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक विभागाची दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत गस्त केली जात होती. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने आता पहाटे ४ पर्यंत गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.