आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इगतपुरी:कसारा घाटात राष्ट्रीय महामार्गासह, रेल्वेच्या ट्रॅकवर दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

इगतपुरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम

दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी रात्री 11 वाजता मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. यामुळे महाकाय दगडी व मातीचा मलबा रस्त्यावर आला आहे. काही वेळ वाहतूक विस्कळीत होऊन संतगतीने वाहतूक सुरू होती. दरड कोसळल्याचे समजताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केशव नाईक, कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन टीम या समाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये शाम धुमाळ, मनोज मोरे, अक्षय राठोड, विनोद आयरे, दत्ता वाताडे, महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे कर्मचारी यांचा समावेश आहे.

दरड कोसळलेल्या ठिकाणी जाऊन नाशिककडे जाणाऱ्या वाहणांना थांबवून रस्यावरील एक लेन सुरु करण्यासाठी लहान दगडी बाजूला करून एक लेन संथ गतीने सुरु केली. दरम्यान, कसारा पोलीस ठाण्याचे अधिकारी केशव नाईक व महामार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी अमोल वालझडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व टोल कंपनी यांच्याशी मदतीसाठी संपर्क केला. दोन तासानंतर जेसीबीला घटनास्थळी पाठवण्यात आले असून त्यानंतर रस्त्यावरील दगडी आणि मलबा बाजूला करण्यात आला. त्यानंतर सदरील महामार्ग वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला.

दरम्यान रात्री 11 ते 1 या वेळात भर पावसात पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी नाशिककडे जाणारी वाहतूक विशेषतः लहान वाहणांची वाहतूक ब्याटऱ्यांच्या साहाय्याने एका लेन ने संथ गतीने सुरु ठेवली. रात्री 01:40 दरम्यान संबंधित पीक इन्फ्रा कंपनीचे कामगार आल्यानंतर मध्यरात्री 02:45 ला जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्यात आली व सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात काही झाडे व माती रत्यावर आली तर ओहळची वाडी जवळील वळनावर् काही दरडी कोसळल्या होत्या.

रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम
रविवारी रात्रीपासून ते आज् सकाळ पर्यंत मुंबई नाशिक महामार्गांवर दरडी कोसळली होती. तर दुसरीकडे, सोमवारी सकाळी रेल्वेच्या कसारा इगतपुरी रेल्वे मार्गांवर सकाळी 6 वाजता किलो मिटर क्रमांक १२२/३८ वर महाकाय दरडी, झाडे व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅक वर कोसळला. यामुळे मध्य रेल्वेची मुबईहून नाशिक दिशेकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे ट्रॅक वरील मलबा काढल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली.

बातम्या आणखी आहेत...