आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये संतापजनक घटना:सहा महिन्यांच्या मुलीला भिकारी महिलेकडे सोडून जन्मदात्या आईचे पलायन

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांच्या मुलीला जन्मदात्या आईने एका भिकारी महिलेकडे सोडून पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी 12 वाजता सीबीएस बस स्थानकात घडला. या महिलेचा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या अधारे शोध घेत तिला शोधून काढले असून, मुलीला चाइल्ड लाइनकडे सुपूर्द करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या बाल कक्षात मुलीवर उपचार सुरू आहेत.

पथक घटनास्थळी दाखल

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुपारी सीबीएस बस स्थानकात एक भिकारी महिलेच्या जवळ लहान मुलगी असल्याची माहिती काही नागरिकांनी चाइल्ड लाइनला दिली. माहिती मिळताच चाइल्ड लाइनने पथक घटनास्थळी दाखल झाले. संबधित महिलेला विचारले असता तिच्या आईने बाळ येथे सोडून पलायन केल्याची माहिती दिली. पथकाने सरकारवाडा पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बस स्थानकातील सीसीटीव्हीच्या अधारे संबधित महिलेचा शोध घेतला तिच्या वर्णनाच्या अधारे पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर शोध घेतला असता ती पंचवटी परिसरात मिळून आली. तिला मुलीबाबत विचारले असता तिने काहीहा सांगितले ले नाही. अखेर तिने मुलीला संबधित महिलेकडे सोडून दिल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे, उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे यांच्या पथकाने एक तासात मुलीच्या आईचा शोध घेत तीला मुलगी परत दिली.

आईला दिली ताकीद

पोलिसांनी संबधित महिलेला मुलगी परत देताना ताकीद दिली. यापुढे असा प्रकार झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. संबधित महिला काही साहित्य विक्री करण्यासाठी गेली होती. साहित्य जास्त असल्याने तीने मुलीला भिकारी महिलेकडे सोडल्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...