आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्षमीकरण:15 हजार महिलांना प्रशिक्षण ; महाराष्ट्र चेंबरचा रूमा देवी फाऊंडेशनसाेबत करार

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर या उद्याेजक-व्यापाऱ्यांच्या राज्यातील शीर्ष संघटनेने महिला सक्षमीकरणाची चळवळ उभारण्याचा संकल्प केला अाहे. याअंतर्गत, महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून ३० हजार महिलांना प्रशिक्षित करून रोजगार देणाऱ्या व सर्वोच्च नारीशक्ती पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित श्रीमती रूमादेवी यांच्या समवेत करार केला अाहे. यानुसार नाशिकमधील १५ हजार महिलांना गारमेंट, टेक्स्टाइल डिझाईन, सरफेस ऑर्नामेंटेशन, हॅंडीक्राफ्टसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी दाेन महिन्यांचा असून ते पुर्णत: नि:शुल्क असेल. याशिवाय राज्यातील पहिले महिला क्लस्टर देखिल नाशिकमध्येच उभारले जाणार असून त्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षात वेगाने सुरू झालेली अाहे. चेंबरच्या महिला उद्योजकता समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील यांनी यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केला असुन आतापर्यंत मुंबई, नाशिक, सिंधूदुर्ग, अकोला अशा चार ठीकाणी महिलांचे व्यापक मेळावे घेेतले गेल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...