आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:50 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी प्रशिक्षण ; जिल्हा परिषदेचा उपक्रम, प्रवेशासाठी माेफत संधी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या वतीने नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ५० गरजवंत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या नामांकित दर्जेदार संस्थेमध्ये प्रवेशासाठी माेफत प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. यासाठी उपाध्ये काॅलेजची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना यात निवासी प्रशिक्षण देत जेईई, सीईटी, जेईई अॅडव्हान्स या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आमिशा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ३५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड यातून करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या निवडीसोबत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ३ संस्थांच्या निविदा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. त्यातून उपाध्ये काॅलेजची निवड करण्यात आल्याची माहिती मित्तल यांनी दिली. दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांसोबतच संवाद साधला. त्या म्हणाल्या, गुणवत्ता असूनही अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाअभावी अभियांत्रिकीच्या दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश मिळण्यात अडचण येते. अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी जिल्हा परिषदेने योजना सुरू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...