आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:प्रथम कडून वर्षभरात 50 विद्यार्थिनींना प्रशिक्षण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे १६ वर्षांपासून दरवर्षी ७०० विद्यार्थिनींना हेल्थ केअर, आॅटाेमाेटिव्ह फाेअर व्हिल, वेल्डिंग याबाबतचे प्रशिक्षण देऊन राेजगारक्षम केले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील व शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील ५० युवतींना सहायक परिचारिका म्हणून प्रशिक्षित करण्यात आले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना सुहासिनी घोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या संस्थेची ही १३८ वी बॅच असून पुनर्वसनाच्या दृष्टीने विनाशुल्क ‘सहायक परिचारिका’ प्रशिक्षित करण्याचे उदात्त व भरीव कार्य ही संस्था करीत आहे. या कार्यासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी अभिनंदनास निश्चितच पात्र असल्याचे यावेळी घोडके आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या. यावेळी केंद्रप्रमुख दीपाली सातारकर, केंद्रप्रमुख श्रीकांत लहाने, ट्यूटर स्तुती सोनवणे, राजेंद्र साळवे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहा शिंदे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...