आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय‎:आयआयटी मुंबईतर्फे प्रशिक्षण, 15 केस‎ स्टडीद्वारे विद्यार्थी शोधणार समस्यांवर उपाय‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत आयआयटी‎ मुंबईतर्फे मविप्र संचलित केटीएचएम‎ महाविद्यालयात ‘केस स्टडी’ या विषयावर‎ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या‎ कार्यशाळेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांना‎ सहभाग नोंदवला. केटीएचएम‎ महाविद्यालयाकडून ग्रामीण महाराष्ट्रातील‎ समस्यांवर १५ केस स्टडी तयार केल्या जाणार‎ आहेत.‎ केस स्टडी पद्धती ग्रामीण महाराष्ट्रातील‎ प्रश्नांची उकल करण्यासाठी उपयुक्त असून‎ समस्यांचा अभ्यास केस स्टडी पद्धतीने अभ्यास‎ केला असता निश्चितपणे समस्यांच्या‎ कारणाचा शोध घेता येईल, असे मत‎ आयआयटी मुंबईच्या प्राध्यापिका डॉ. प्रिया‎ जाधव यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना केस‎ स्टडी पद्धतीने शैक्षणिक अभ्यास करण्यासाठी‎ प्रोत्साहित केल्यास शैक्षणिक संस्था ग्रामीण‎ भागाच्या विकासासाठी चांगले योगदान देऊ‎ शकता असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्राचार्य‎ व्ही. बी. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. वसंत‎ बोरस्ते, डॉ. गोपाल चव्हाण, डॉ. हेमंत बेलसरे,‎ डॉ. प्रवीण नलावडे, कार्यशाळेचे समन्वयक‎ डॉ. संभाजी पगार, डॉ. ज्ञानेश्वर पवार उपस्थित‎ होते. यावेळी विद्यार्थ्यांना उन्नत महाराष्ट्र‎ अभियानाची रचना, सद्यस्थिती, उन्नत‎ महाराष्ट्र अभियानाची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना‎ समजावून सांगितली. डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी‎ चांदवड तालुक्यातील माती अनुरूपता या‎ विषयावरील केस स्टडी सादरीकरण केले.‎

बातम्या आणखी आहेत...