आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेचे आयाेजन:हायटेक उद्याेगासाठी प्रशिक्षण;विभागात ६ सप्टेंबरपासून प्रारंभ

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महाराष्ट्र शासनाचे उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गांसाठी अनिवासी मोफत ‘हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास’ प्रशिक्षण ७ सप्टेंबरपासून तर अनुसूचित जमातीसाठी ‘निवासी उद्योजकता विकास’ प्रशिक्षणास ६ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण शहरातील तीन महाविद्यालयांत होणार आहे. त्यातील ‘अप्लाइड डेटा सायन्स अॅन्ड अॅनॅलिटिकलसाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे इंजिनिअरिंग महाविद्यालय, आयटी आॅटोमेशन प्रोग्राम अॅण्ड बेसिक जापनीज् हा कोर्स केबीटी इंजिनिअरिंग काॅलेज तर सायबर सिक्युरिटी अॅण्ड डाटाबेस रिकव्हरी या कोर्ससाठी एमव्हीपी काॅमर्स मॅनेजमेंट अॅण्ड काॅम्प्युटर सायन्स काॅलेज, नाशिक येथे प्रशिक्षण दिले जाईल. उद्याेग व्यवसायात घडत असलेले बदल व त्यातून तयार हाेणारे उद्याेजक यावरही मार्गदर्शन केले जाईल.

अनुसूचित जमातीचे प्रशिक्षण विकेंड होममध्ये
नाशिकच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने अनुसूचित जमातीच्या बेरोजगार उमेदवारांसाठी उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक असलेले उद्योजकता विकास प्रशिक्षण हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलरोडवरील आंबोली वीकेंड होम या ठिकाणी आयोजित केले आहे. त्यासाठी ४० उमेदवारांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यात २५ नाशिक जिल्ह्यातील असून, १० अहमदनगर आणि ०५ धुळे जिल्ह्यातील उमेदवारांची निवड कऱण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रकल्प अधिकारी मंगेश बनकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...