आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासैन्यदलात सेवा बजावण्यासाठी आणि जास्तीत जास्त तरुणांना रोजगार प्राप्त यासाठी केंद्र शासनाने इच्छूक सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजना सुरू केली. या अग्निविरांची भरती करण्यात आली असुन त्यांना एक आठवड्यापासुन नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये खडतर प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.
अग्निवीरांसाठी देशाच्या विविध राज्यातील तरुणांचा या मध्ये समावेश आहे. तोफखान्याचे कमान्डंट ब्रिगेडियर अे.रागेश यांच्या नेतृत्वाखाली अग्निविरांसाठी सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली असल्याची माहिती लेफ्टनंट कर्नल एस.के.पांडा यांनी शनिवारी (दि.7) पत्रकार परिषदेत सांगितली.
भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी देशसेवा करण्याची संधी या योजनेतून युवकांना देण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा उद्देश केंद्र शासनाने ठेवला असुन संपुर्ण देशात 25 हजार तरुणांना अग्निविरांची सैन्यात भरती करण्यात येत आहे. आर्टिलरी सेंटर रोडवरील अशोकचक्र प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला स्वतंत्र असे ‘अग्निवीर रिसेप्शन सेंटर’ उभारण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी बंदुकधारी सैनिकांचे छायाचित्रांचे फलक लावण्यात आले असुन येणाऱ्या आणि भरती झालेल्या तरुणांची ऊर्जा वाढवित आहे. या केंद्रात या तरुणांची बायोमॅट्रिक तपाासणी, मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. तर सैनिकांनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा इतिहास याठिकाणी दाखविण्यात येतो.
लेफ्टनंट कर्नल निखिल पी., यांची नेमणूक करण्यात आली असुन तोफखाना केंद्रात प्रवेश केल्यानंतर रिसेप्शन सेंटरमध्ये अग्निवीर तरुणांची कायदेशीर कागदोपत्रांची तपासणी करुन प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. संपुर्ण प्रक्रिया झाल्यानंतर या भरती झालेल्या तरुणांना त्यांच्या निवासाच्या जागी ठेवण्यात येते. राज्यात अहमदनगर आणि नाशिकरोड येथे प्रशिक्षण केंद्र असुन आर्टिलरी सेंटर मध्ये सर्वात जास्त तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
अग्निवीरांना मिळणार 31 आठवड्यांचे प्रशिक्षण
नाशिक ताेफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गनर, तांत्रिक सहाय्यक (टेक्निकल असिस्टंट), रेडिओ ऑपरेटर, मोटार ड्रायव्हर या चार पदांवर सेवा बजावावी लागणार आहे. यासाठी मुलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून देण्यात येत असुन 10 आठवड्यांचे प्राथमिक सैनिकी तर 21 आठवड्यांचे ॲडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे. एकूण 31 आठवड्यांचा प्रशिक्षण कालावधी राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.