आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी‎:बेलारुसीयन युनिव्हर्सिटीत‎ भारतीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण‎

नाशिक‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१०२ वर्षांचा अनुभव असलेल्या‎ रशियातील बेलारुसीयन टेक्निकल‎ युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय‎ विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि‎ रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची तसेच‎ स्कोपस आणि एससीआय या‎ जागतिक दर्जाच्या जर्नलमध्ये‎ शोधनिबंध सादरीकरणाची संधी‎ उपलब्ध झाली आहे.‎ बेलारुसीयन टेक्निकल‎ युनिव्हर्सिटी आणि नाशिक येथील‎ संदीप फाउंडेशन यांच्यात‎ सामंजस्य करार करण्यात आला‎ आहे.

या कराराद्वारे दोन्ही‎ संस्थांमध्ये विद्यार्थी विनिमय,‎ विदेशी भाषा शिक्षण, व्यवसाय‎ प्रशिक्षण, नवीन संशोधन तसेच‎ शोधनिबंध आंतराष्ट्रीय दर्जाच्या‎ जर्नलमध्ये प्रसिद्ध होणार‎ असल्याने शिक्षणाचा दर्जाही उच्च‎ कोटीचा राहणार आहे. तसेच‎ उन्हाळा आणि हिवाळ्यात २-२‎ महिन्यांचे प्रशिक्षणाचीही सुविधा‎ यातून उपलब्ध झाली.

यावेळी‎ बोलताना संदीप फाउंडेशनचे‎ अध्यक्ष डॉ. संदीप झा म्हणाले,‎ परदेशी विद्यापीठाबरोबर सामंजस्य‎ करारामुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी‎ उपलब्ध होण्याबरोबरच अद्ययावत‎ ज्ञान, तंत्रज्ञान व प्रशिक्षण शक्य‎ होईल. नवीन शिक्षण धोरणात‎ अभिप्रेत असलेले परिणाम‎ आधारित शिक्षण ध्येय सहज‎ साध्य होण्याचा विश्वास व्यक्त‎ केला. याप्रसंगी बेलारुसीयन‎ टेक्निकल युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष‎ सर्गेई खर्यीएमतोंयचक, युरी‎ निजालिंचिक, मारिया व्योत्साफा,‎ डॉ. दीपक पाटील, मनीष विंग‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...