आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिमत्त्व विकासावर भर:विद्यार्थिनींच्या विकासासाठी शिक्षकांना प्रशिक्षण ; अशोका स्टडीज अॅण्ड रिसर्च सेंटरचे आयाेजन

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक कौशल्य निर्मितीचे प्रशिक्षण, डिजिटल ओळख, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तसेच विद्यार्थिनींच्या करिअरसाठी आता थेट शिक्षकांनाच प्रशिक्षित करण्यात आले. शिक्षकांमध्येच ही मूल्य विकसित केली तरच विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहाेचतील. यासाठी अशोका इंटरनॅशनल सेंटर फाॅर एज्युकेशनल स्टडीज अॅण्ड रिसर्च महाविद्यालयात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

कॉलेजच्या एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट सेलने शिक्षक प्रशिक्षकासाठी कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार नांदी फाउंडेशन आणि महिंद्रा प्राइड क्लासरूम यांच्या सहकार्याने ९ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान हा उपक्रम झाला. त्यात शिक्षकांनी खुद्द विद्यार्थिनींची मुलाखत घेतली. सर्जनशीलता निर्माण करण्यावर आणि समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रभारी प्राचार्या प्रा. सरिता वर्मा, नांदी फाउंडेशनच्या रुबी पाधी यांनी विद्यार्थिनींची रोजगाराभिमुख व्यक्तिमत्त्व तयार करण्यासाठी विशेष उपक्रमांचा चर्चासत्रांचा या कार्यशाळेत समावेश केला. अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक कटारिया यांनी या उपक्रमाचे काैतुक केले.

बातम्या आणखी आहेत...