आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर सौंदर्यीकरण:स्वच्छतेकडे सीमाेल्लंघन; आज शुभारंभ, स्वच्छ शहर स्पर्धेत स्थान घसरल्याने संकल्प

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नाशिकची घसरगुंडी झाल्यानंतर आता पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिकेच्या वतीने शहर सौंदर्यीकरण अभियानातून स्वच्छतेकडे सीमाेल्लंघनाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५ वर्गवारीमध्ये कचऱ्याचे विलगीकरण केले जाणार असून त्याची सुरुवात आज दसऱ्यापासून पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरी होणार आहे.

आयुक्त बंगल्यावर देखील आज त्याचा आैपचारिक शुभारंभ होणार आहे.२०२० नाशिकने केंद्राच्या स्वच्छ शहर स्पर्धेत अकराव्या स्थानावर मजल मारली. देशातील पहिला दहा शहरात येण्याचे स्वप्न अवघ्या एका स्थानाने हुकल्यामुळे महापालिकेने संपूर्ण ताकद पणाला लावली.

मात्र, सन २०२१ मध्ये सतराव्या स्थानावर घसरण झाली. २०२२ मध्ये तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी सिटिझन फीडबॅक नोंदवण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच नाशिककरांची मदत घेतली, मात्र त्यानंतरही विसावा क्रमांक आल्यामुळे आतापासूनच पालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी स्वच्छता मोहिमेकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कचरा वर्गीकरण बंधनकारक केले जाणार आहे.

या पाच प्रकारांत होणार कचऱ्याचे विलगीकरण
शहर सौंदर्यीकरण अभियानात पाच प्रकारात कचरा विलगीकरण करावे लागणार आहे. ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा, वेस्ट व घरगुती घातक कचरा याप्रमाणे पाच प्रकारांत वर्गीकरण करून घंटागाडी कामगारांकडे कचरा सुपूर्द करावा लागेल.

प्रत्येक कर्मचाऱ्याला कचरा विलगीकरण बंधनकारक
स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकला नंबरात आणण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागणे गरजेचे आहे. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांना कचरा विलगीकरण बंधनकारक केले जाईल.- डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, महापालिका.

बातम्या आणखी आहेत...