आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तांतरानंतर बदल्यांचे वारे:नाशिकचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी मुळ सेवेत; महसूल विभागात बदली

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विविध विभागांत बदल्यांचे वारे वाहु लागले असून उद्याेगमंत्र्यांच्या आदेशाने एमआयडीसीच्या 20 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिकचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना त्यांच्या मुळ सेवेत म्हणजे महसुल विभागात पाठविण्यात आले आहे.

राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर एमआयडीसीच्या बदल्यांची चर्चा सुरू झाली हाेती. ती खरी ठरली असून राज्यातील 8 प्रादेशिक अधिकारी आणि 4 उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि 8 महाव्यवस्थापकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहे. महसुल विभागातून आलेले व कार्यकाळ पुर्ण झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्त करून मुळ सेवेत परत पाठविण्यात आले आहे. या विस जागांवर महसुल विभागातून 17 तर सिडकाे आस्थापनेतील 1 आणि महाराष्ट्र विकाससेवा (ग्रामविकास) संवर्गातील 2 अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे.

गवळी यांच्या जागी कोण?

नितीन गवळी यांच्या जागेवर प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी येथे कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता उद्योग वर्तुळात आहे. गवळी हे नाशिक जिल्ह्याचे भुमिपुत्र आहेत. त्यामुळे नवी औद्याेगिक गुंतवणूक जिल्ह्यात यावी याकरीता त्यांच्याकडून प्रयत्न केले जात हाेते.

सुभाष देसाईंच्या काळातील नियुक्त्या

ठाकरे सरकारमधील उद्याेगमंत्री सुभाष देसाइ यांच्या कार्यकाळात नियुक्त्या मिळालेल्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा सध्या सुरू असून एमआयडीसीतील या बदल्याही याचाच भाग असल्याचे मानले जाते. यापुर्वी शिंदे सरकार स्थापन झाल्याच्या दाेन महिने पुर्वीपर्यंत वितरीत झालेल्या भुखंडांनाही स्थगिती देण्यात आली हाेती. त्यानंतर हा दुसरा माेठा निर्णय मानला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधितांना, आदेश झाले त्याच दिवशी सेवेतून कार्यमुक्त करत मुळ सेवेत पाठविण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...