आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Transparency Internal District Transfer Process Of Primary Teachers | Congratulations State Government From BJP State Vice President Madhav Bhandari

प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत जिल्हा बदली प्रक्रियात पारदर्शकता:भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारींकडून सरकारचे अभिनंदन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत पारदरशकता अण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून यापूर्वीच्या राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता. मात्र सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते, अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारने तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याने त्यांचे भाजपा कडून अभिनंदन करण्यात आले.

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्याकडून शिंदे- फडणवीस सरकारचे अभिनंदन राज्यातील सुमारे 4 हजार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या मानवी हस्तक्षेपाशिवाय ऑनलाईन प्रणालीने आंतर जिल्हा बदल्या केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे.

गैरप्रकाराला आळा

अशा पद्धतीने आंतरजिल्हा बदल्यांची प्रणाली विकसीत करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण झाल्यामुळे बदल्यांमधील गैरप्रकारांना आळा बसेल, असेही भांडरी यांनी म्हटले आहे.

स्वयंचलित पद्धतीने बदल्या

या पत्रकात भांडारी यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला होता. शिक्षक संघटनांनीही बदली प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात तक्रारी केल्या होत्या. या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेपामुळे शिक्षकांचा छळही केला जात होता. त्यामुळेच अशा पद्धतीची राजकीय हस्तक्षेपाला दूर ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित केली जावी अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. ही मागणी आता पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाद्वारे 3 हजार 943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली आदेश ऑनलाईन प्रणालीद्वारे जारी करण्यात आले आहेत. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शंभर टक्के स्वयंचलित पद्धतीने या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली प्रक्रियेचा गैरवापर

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी विकसीत करण्यात आलेल्या प्रणालीमुळे बदल्यांच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. या बदल्यांसाठी ठरवण्यात आलेल्या निकषांनुसारच ही प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. ग्रामीण भागातील सरंजामदारांकडून राजकीय हेतूंनी प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेचा गैरवापर होत असे. या सरंजामदारांना या बदली प्रक्रियेमुळे चाप बसला आहे, असेही भांडारी यांनी नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...