आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Transport Charges For School To Home From Rs 600 To Rs 900; The Increase In Fuel Prices Has Led To A 40% Increase In School Fares |marathi News

दिव्य मराठी विशेष:घराजवळील शाळेत जाण्यासाठी वाहतूक शुल्क 600 वरून 900 रुपयांवर; इंधन दरवाढीने शालेय वाहतूक शुल्क 40 % वाढले

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा सुरू होताच शैक्षणिक शुल्कात वाढ आणि महागड्या पुस्तकांच्या दणक्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या वाहतूक शुल्कातही मोठी वाढ करण्यात आलेली आहे. शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणारे वाहनचालकांकडून या शुल्कात तब्बल ४० टक्के वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जवळच्या शाळेचे शुल्क ही ६०० ते चक्क ९०० रुपये करण्यात आल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर सव्वाशे रुपये लिटरच्या जवळपास गेले आहेत. तसेच डिझेलनेही केव्हाच शंभरी पार केली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला असून, आता जवळपास सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांचे घर खर्चाचे बजेटही कोलमडून गेले आहे.त्यात आता दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या शाळेचे खर्चही वाढले असून शालेय वाहतुकीच्या दरात ही प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्यांना अधिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधित शाळा बंद होती. यंदा शाळा आॅफलाइन सुरू झाल्याने विद्यार्थी व पालक उत्साहित आहेत. शाळांमध्येही विद्यार्थी प्रवेशाेत्सव पार पडला. असे सर्व उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे शालेय साहित्य तसेच पुस्तके व वह्यांचे दर वाढले आाहेत. यामुळे पालकांना या दरवाढीला सामाेरे जावे लागत असतानाच त्यात शालेय विद्यार्थी वाहतूक शुल्कात केलेल्या वाढीची भर पडली आहे. यामुळे पालकांचे बजेट बिघडले आहे. या शुल्कात थेट ४० टक्के वाढ करण्यात आल्याने ही वाढ चुकीची असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

कोरोना काळात नुकसान
इंधन दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. त्याचा फटकाही शालेय वाहतूक करणाऱ्यांना ही बसला आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्ष शालेय वाहतूक या वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. या दरम्यानचा देखभाल खर्चदेखील मोठा होता.त्यामुळेच शुल्क वाढीचा निर्णय घेतल्याचे शालेय वाहतूक करणारऱ्या एका वाहनचालकांकडून सांगण्यात आले.

३० ते ४० टक्क्यांनी वाढ...
विद्यार्थ्यांचा गणवेश, शालेय पुस्तके, वही व इतर खर्चात महागाईमुळे मोठी वाढ झाली आहे. त्यात आता शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ६०० रुपयांवरून थेट ९०० रुपये शुल्क करणे चुकीचे आहे.
- इम्तियाज शेख, पालक

बातम्या आणखी आहेत...