आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विज्ञान केंद्राद्वारे दुर्गम भागात विज्ञानाची गाेडी; मराठी विज्ञान परिषदेचा उपक्रम

इंदिरानगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्गम भागातील विद्यार्थांमध्ये विज्ञानाची गाेडी निर्माण व्हावी, सर्व गावकऱ्यांमध्ये वैज्ञानिक मानसिकता जोपासली जावी या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने पेठ येथील आंबे गावात विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले. बालदिनाचे आैचित्य साधत या केंद्राचे लाेकार्पण सरपंच मेघराज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

दुर्गम भागात आजही अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. मात्र या अंधश्रद्धा दूर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकाेन रुजावा, त्यांना विज्ञानाची गोडी लागावी तसेच सर्व गावकऱ्यांमध्ये वैज्ञानिक मानसिकता जोपासली जावी या उद्देशाने हे विज्ञान केंद्र सुरू होत असल्याबद्दल मराठी विज्ञान परिषद विभागाचे अध्यक्ष डॉ. धनंजय अहिरे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले असून या केंद्रासाठी आवश्यक असे विज्ञान साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा तथा नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा वाळवेकर यांनी गावकऱ्यांकडे सुपूर्द केले. परिषदेचे कार्यवाह अजित टक्के यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खेळातून विज्ञानाच्या प्रयोगांचे सादरीकरण केले. विज्ञान केंद्र सुरू करण्यात जनजागृती कलापथकाचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांचे विशेष सहकार्य मिळाले, तसेच ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष किशोर गायकवाड यांनीही यावेळी संवाद साधला. यावेळी डॉ. श्रद्धा वाळवेकर यांनी गावातील आशासेविका व अंगणवाडीसेविका यांचे महिलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण याविषयी प्रबोधन केल.

या केंद्राच्या माध्यमातून हाेणार विज्ञानाचा प्रचार
या केंद्राच्या माध्यमातून छाेेटे-छाेटे प्रयाेग विद्यार्थ्यंाना करून दिले जाते. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकाेन या माध्यमातून विकसित हाेण्यास चांगली मदत हाेणार आहे.- डॉ. धनंजय अहिरे, विभागीय अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद

बातम्या आणखी आहेत...