आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कर्करोगाची भीती न बाळगता उपचार घ्यावे ; गजानन ट्रस्ट, जैन प्रकोष्ठ यांच्यातर्फे कर्करोग तपासणी शिबिर

नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असून यामध्ये कर्करोग हा झपाट्याने वाढणारा आजार आहे.या आजाराची लक्षणे महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसतात. त्यामुळे महिलांनी न घाबरता, न लाज बाळगता त्वरित उपचार घ्यावे, जेणेकरून पुढील आयुष्य हे निरोगी जगता येईल, असा सल्ला श्री गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष व अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांनी दिला. नाशिकरोड येथील शिखरेवाडी येथे गजानन चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय जनता जैन प्रकोष्ठ यांच्यातर्फे सोमवारी (दि. १४) स्वयंसिद्धा सभागृहात मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विनायक गोविलकर यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले.

यावेळी आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष अंबादास कुलकर्णी, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, बिझनेस बँकेचे अध्यक्ष अशोक तापडिया, कांता वराडे, ब्रह्माकुमारीच्या गोदावरी दीदी, जैन प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, उमाकांत उपाध्याय, गजानन तितरे, राजू मोरे, आसावरी मोरुस्कर, ज्योती चव्हाणके, मंगेश पगार, डॉ. प्रभालता जाधव, जगजीत सिंग, शोभा वाजे यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी गोविलकर म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्यासाठी चांगले शिबिर असून कर्करोग ग्रस्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

तर संदीप भंडारी म्हणाले की कर्करोगाबदल जनजागृती झाली पाहिजेत, ह्याचे रुग्ण झपाटयाने वाढत असून वेळीच उपचार झाले तर रुग्ण रोगमुक्त होऊन त्याला दीर्घायुष्य मिळेल. केवळ व्यसनाधीन व्यक्तीलाच कर्करोग होतो असे नाही तर सर्वसाधारण नागरिकांमध्ये याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट हा कर्करोग मुक्त होण्यासाठी राज्यात शहराबरोबर ग्रामीण भागातही तपासणी करण्यात येणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...