आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिपथात:अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार; दुबईच्या मराठी दांपत्याचे मुल होण्याचे स्वप्न नाशकात दृष्टिपथात

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईला राहणाऱ्या मराठी दांपत्याने मुल होण्यासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार केले. मात्र त्यांचे अपत्य प्राप्तीचे स्वप्न अखेर नाशिकमधील प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमधील उपचाराने पूर्ण झाले. राजाराम आणि प्रियंका खांडळ हे कामानिमित्त दुबईत असतात. त्यांचा विवाह होऊन १५ वर्ष झाली तरी मुलं होत नव्हते. त्यांनी फर्टिलिटी ट्रीटमेंट घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम दुबईत असल्याने यु.ए.ई मधील हॉस्पिटलमध्ये तिथल्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी उपचार करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान उपचारासाठी जोडपे नाशिकमध्ये आले. प्रियंका खांडळ यांच्या आईने लेक आणि जावई यांना नाशिकमधील या सेंटरधील उपचार पद्धतीबद्दल सांगितले. प्रियांका खांडळ यांना ‘वेट इसूस’मुळे तुम्ही कधीही गरोदर राहू शकणार नाही, असे सांगितले होते. परंतु प्रसिद्ध वध्यत्वविकार तज्ज्ञ डॉ. नरहरी मळगावकर आणि डॉ. सोनाली मळगावकरांनी प्रियांका यांना आत्मविश्वास दिला. अन् सावरले देखील. डॉक्टरांच्या योग्य आणि आधुनिक उपचारामुळे या जोडप्यांचे स्वप्न अखेर दृष्टिपथास आले. पहिल्याच सायकलमध्ये त्यांना तुम्ही आई- बाबा होणार असे सांगण्यात आले. त्यामुळे खांडळ दाम्पत्य अन् त्यांच कुटुंबीय रुग्णालयातील कर्मचारीही सुखावले. प्रियंका खांडळ यांना याेग्य आहाराच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या.

ठरवलं तर अवघड काही नाही
वैद्यकीय शास्त्रात नवनवीन तंत्र येत असताना मनात ठरवलं तर अवघड असं काही नाही. खांडळ दाम्पत्य आई-बाबा हाेणार असल्याचे समाधान आहे. त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाले. यासाठी त्यांचाही आत्मविश्वास महत्वाचा ठरला.
- डॉ.नरहरी मळगावकर

स्वप्न पूर्तीचे समाधान
प्रोजेनेसिसच्या उपचारामुळे बाळ होण्याची स्वप्नपूर्ती झाली. त्यामुळे आमचं बाळ होण्याचं स्वप्न सत्यात उतरलं. आम्ही डॉक्टरांचे आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
- राजाराम खांडळ व प्रियंका खांडळ

बातम्या आणखी आहेत...