आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एचआयव्हीबाधितांवर ठाकरे रुग्णालयात उपचार; एडस दिनानिमित्ताने नाशिकरोड परिसरात जनजागृती रॅली

नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील एचआयव्हीबाधितांना जिल्हा रुग्णालयात उपचार आणि औषधे दिली जात होती. मात्र जागतिक एड‌्स दिनानिमित्ताने आता प्रत्येकवेळी नाशिकरोड येथील मनपाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रात औषधांसह उपचार केले जाणार आहे. एड्स दिनानिमित्ताने नागरिकांमध्ये एचआयव्ही आजाराबाबत जनजागृती व्हावी यासाठी शनिवारी सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. रॅलीत के. जे. मेहता हायस्कूल, श्रीमती बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

एड‌्स दिनानिमित्ताने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच या आजाराबाबत माहिती मिळावी यासाठी नाशिकरोडच्या ठाकरे रुग्णालयातून शनिवारी सकाळी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यासाठी शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा काळे, नोडल ऑफिसर डॉ. जितेंद्र धनेश्वर, योगेश परदेशी, सुनीता बोरसे, सचिन शिलावट, आशा मुठाळ, माग्मो वेल्फेअर संस्थेच्या माधुरी भामरे, धन्वंतरी सामाजिक संस्थेचे कर्मचारी, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे कुलदीप पवार अविनाश भावसार, संदीप चव्हाण, सुजाता जेजूरकर, अनिता गोरे, कुंदन पवार, सीमा काळकर, तानाजी इंगळे हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एड‌्सबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून घोषणा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...