आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक:सिंगापूरच्या धर्तीवर ट्री पॉड अन् आकर्षक राइड्स; सेंट्रल पार्कचे ९५ टक्के काम पूर्ण

सिडको4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील पेलिकन पार्कच्या १७ एकर जागेवर आता सुसज्ज असे सेंट्रल पार्क साकारण्यात आले आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या जागेचे रुपडे पालटले असून नाशिककरांना आता मनोरंजनासह आकर्षक राईड्स, मिनी ट्रेन या आधुनिक सुविधांचा आनंद घेता येईल. पहिल्या टप्प्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. आता येत्या दोन महिन्यांत हे पार्क खुले होण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून खासगीकरणातून पुणा अॅम्युझमेंट लि. या कंपनीला चालवायला दिला होता. त्या कंपनीने एमएसएफसी वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांनी ताबा घेतला होता. हा वाद न्यायालयात गेल्याने तब्बल १२ वर्षे रेंगाळत राहिला.

त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी वेळोवेळी संघर्ष व पाठपुरावा करीत हा प्रश्न सोडवला. १२ जानेवारी २०१५ ला हा दावा संपुष्टात आला. ३१ जानेवारी २०१८ ला महापालिकेने प्रस्ताव ठेवला. त्याला महासभेने मंजुरी देत या ठिकाणी सेंट्रल पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. सिंगापूरच्या धर्तीवर देशातील एक सुंदर व आकर्षक पार्क होणार असून त्याच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आले आहे.

बातम्या आणखी आहेत...