आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रमशाळेतील टेंडरप्रकरणी कारवाई:नाशिकमध्ये आदिवासी विकास अभियंता 28 लाख 80 हजार लाच घेताना अटकेत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी विभाग आश्रमशाळेतील सेंट्रल किचनच्या टेंडरसाठी तब्बल २८ लाख ८० हजारांची लाच स्वीकारताना विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल याला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२५) बागुलच्या तिडके काॅलनीतील नयनतारा सिटी वन या इमारतीत ही कारवाई केली. दोन दिवसांत विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी तीन सापळे यशस्वी करत मुख्य कार्यकारी अधिकारी, तलाठी यांना अटक केली आहे.

लाचलुचपत विभाग आणि तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार आदिवासी विभागाच्या हरसूल येथील आश्रमशाळेसाठी सेंट्रल किचनचे २ कोटी ४० लाखांचे ऑनलाइन टेंडर भरले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला हे टेंडर मिळाले होते. मंजूर टेंडरची एक काॅपी देण्यासाठी अभियंता बागूल याने टेंडरच्या किमतीच्या १२ टक्के दराने २८ लाख कमिशनची मागणी केली होती. ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पंधरा दिवसांपूर्वी तक्रार केली होती. पथक पंधरा दिवसांपासून रोज आदिवासी कार्यालय, हरसूल आश्रमशाळा आणि बागूल याच्या निवासस्थानी सापळा रचत होते. ठेकेदाराशी बागूल यांनी गुरुवारी संपर्क साधला व पैसे घरी घेऊन येण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...