आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगीतिक कार्यक्रम:अजरामर गीतांनी लतादीदींना श्रद्धांजली‎

इंदिरानगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोगरा फुलला... स्वर गंगेच्या काठावरती‎ वचन दिले तू मला, यासारख्या विविध‎ अजरामर गीतांनी संगीत मैफल रंगली. या ‎ ‎ कार्यक्रमातून गायिका लता मंगेशकर यांना ‎ ‎श्रद्धांजली वाहण्यात आली. एकापेक्षा एक‎ सरस गीत सादर करीत रसिक श्रोत्यांची ‎ ‎उत्स्फूर्तपणे साथ मिळाल्याने कार्यक्रम रंगत‎ गेला.‎ कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांचे वतीने‎ भारतरत्न लता दीदी यांच्या प्रथम‎ स्मृतिदिनानिमित्त ‘स्वर मंगेशाचे’ या‎ सांगीतिक कार्यक्रम महाकवी कालिदास कला‎ मंदिर येथे मंगेशकर पाचही भावंडांवर‎ आधारित सादर केला.

निर्मिती संकल्पना‎‎ गायिका चैत्राली अभ्यंकर यांची हाेती. यात‎ मुंबईचे गायक अॅड. अमित दाते आणि गायक‎ संदीप थाटसिंगार यांनी गायन केले. वाद्यवृंद‎ संयोजन रागेश्री धुमाळ, अनिल धुमाळ,‎ आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा, महेश‎ कुलकर्णी आदींनी साथसंगत केली. संहिता‎ लेखन प्रवीण जोशी यांनी केले. अभिवाचन‎ अक्षय वाटवे यानी केले. वादळ वारं सुटलं ग,‎ सांग सांग भोलानाथ, वेडात दौडले वीर मराठे‎ सात, ने मजसी ने मातृभूमीला या गीतांना‎ रसिकांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमास‎ रसिक मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...