आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक पर्यटन व धार्मिकस्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येत असून २४ काेटींच्या निधीतून यात्रा सुविधा केंंद्रासह दुमजली पार्किंग, कुंडांचे साैंदर्यीकरण आदी कामे प्रगतीपथावर आहेत.
तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून पर्यटन वाढावे, तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, जीर्ण पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा व त्यांचे पुरातत्व जपावे या सद्हेतूने केंद्र सरकारने २०१६ मध्ये प्रसाद याेजना जाहीर केली. या याेजनेत भारतातील आठ तीर्थक्षेत्रांचा समावेश असून महाराष्ट्रातील एकमेव तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. २४ काेटींच्या मिळालेल्या निधीतून त्र्यंबकेश्वरमध्ये बहुमजली कार पार्किंग, तलाव-कुंड यांचे सुशाेभीकरण, भाविकांसाठी प्रसादालय यासारखी कामे पहिल्या टप्प्यात हाती घेतली गेली हाेती, ही कामे दाेन महिन्यांत पूर्णत्वास जाणार असून भाविकांना याचा लाभ लवकरच मिळू शकणार आहे.
त्र्यंबकेश्वरचा विकास करण्यासाठी प्रसाद याेजनेतून शहरात यात्रा सुविधा केंद्राची उभारणी पूर्णत्वास येत असून येथे भाविकांसाठी कॅन्टींन, फूड काेर्ट, अॅम्फिथिएटर असेल. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनचरित्राची माहिती देणारी प्रदर्शनही असेल.
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह
प्रकल्पांचे काम दीड महिन्यात काम पूर्ण हाेणार यात्रा सुविधा केंद्र, पार्किंग इमारत अाणि नारायण नागबली पूजा इमारत हे तिन्ही प्रकल्प दीड महिन्यात पूर्ण हाेतील तर तलावांच्या सुशाेभीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराची कामे सहा महिन्यांत पूर्ण हाेणार आहे. - महेश बागूल , शाखा अभियंता, पर्यटन विभाग
१६० कार पार्किंग क्षमतेचे दुमजली पार्किंग
तीर्थक्षेत्र असल्याने येथे देशभरातून दिवसभरात सरासरी १० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात, याव्यतिरिक्त नारायण-नागबलीसारख्या पूजेसाठी ही तितकेच लाेक महिनाभरात येथे येतात. यामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न लक्षात घेत, दुमजली पार्किंग येथे उभारण्यात आले असून १६० कार पार्क करता येतील.यात्रा सुविधा केंद्राचे अंतीम टप्प्यात आलेले कामभाविकांच्या साेईसाठी सुविधा केंद्रात विविध साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. यात भाविकांना त्र्यबंक नगरीतील विविध ठिकाणे याची माहिती मिळेल. तेथे स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. ते भाविकांच्या विविध अडचणी साेडवतील.निवृत्तिनाथ महाराज मंदिरात नव्या सुविधा या याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यात संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिरासाठी नव्या सुविधा उभारल्या जात आहेत, तीन हजार भाविक उभे राहू शकतील असा सभामंडप, दर्शनबारीे, प्रशासकीय इमारत आणि पुजाऱ्यांकरिता क्वाॅर्टर्स उभारले जात आहेत...या तीर्थक्षेत्रांचा प्रसाद याेजनेत समावेश सोरटी सोमनाथ, जम्मू-काश्मीरमधील हजरतबल, झारखंडमधील देवघर, मध्य प्रदेशातील उज्जैन, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, उत्तर प्रदेशातील अयोध्या, पश्चिम बंगालमधील बेलूर ही आठ तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी निवडली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.