आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त सातपूरला १३० वर्षांहून अधिक काळ अखंडीतपणे गुढी पाडव्याच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा उत्सव खंडीत झाला होता. आता कोरानाचे निर्बंध हटवण्यात आल्याने गुढी पाडव्याला पुन्हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार असून या यात्रोत्सवाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण घाटोळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यासंदर्भात सातपूर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत उत्सवाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण विष्णु घाटोळ यांची तर उपाध्यक्षपदी त्र्यंबक फकिरा भंदूरे आणि कार्याध्यक्षपदी सागर प्रकाश निगळ यांची निवड करण्यात आली. यावर्षी बारा गाड्या ओढण्याचा मान किरण मोहन निगळ या युवकास देण्यात आला आहे.
सातपूर पोलिस स्टेशन येथे पोलिस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती आणि मोहल्ला कमिटी बैठक पार पडली. विजय भंदूरे यांनी सातपूर यात्रोत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर केली. दोन वर्षाच्या खंडानंतर साजऱ्या होणाऱ्या यात्रोत्सवासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती घाटोळ यांनी दिली.
बैठकीस यात्रोत्सव समितीचे पंच शांताराम निगळ, राजाराम निगळ, गोकुळ निगळ, सचिन घाटोळ, शशीकांत घाटोळ, गणेश निगळ, भिवानंद काळे, अनिल मौले, सुरेश भंदूरे, रवी काळे, बजरंग शिंदे, अरुण काळे, अॅड. कपिल निगळ, प्रकाश निगळ आदींसह सातपूर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.