आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड:काेराेना ‘निगेटिव्ह-पॉझिटिव्ह’च्या गोंधळात महिलेचा दोनदा दफनविधी, आईच्या अंतिम इच्छापूर्तीसाठी मनमाडच्या मुलाचा संघर्ष

मनमाड, मालेगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाच्या भीतीने नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे अनेक प्रकार समाेर आले असताना मनमाडच्या सुहास वसंत क्षीरसागरला प्रशासनाच्या निष्ठुरपणामुळे मातेचा मृतदेह मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष मातृप्रेमाची महती वाढवणारा ठरला आहे. तब्बल पावणेतीन महिन्यांपूर्वी केवळ कोरोना असल्याच्या संशयावरून काेविड निर्देशानुसार मालेगावात दफन केलेला आईचा मृतदेह शासकीय परवानगीने बाहेर काढून गुरुवारी (दि. १७) मनमाडला पतीच्या कबरीशेजारी पुन्हा दफन करण्यात आला. आईची अंतिम इच्छा पूर्ण करणाऱ्या सुहासच्या संघर्षाने दुरावलेल्या नात्यांमध्ये मायेचा ओलावा निर्माण केला आहे. मनमाड शहरातील डमरे मळा भागात राहणाऱ्या मंजुलता वसंत क्षीरसागर (७६, रा. कॅम्प विभाग, मनमाड) यांना २१ सप्टेंबरला हृदयविकाराचा त्रास झाला.

न्यूमाेनियाच्या लक्षणांमुळे त्यांना उपचारासाठी मालेगावच्या सहारा काेविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचा स्वॅब घेत उपचार सुरू करण्यात आले. मात्र, याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या संशयामुळे शासनाने परवानगी नाकारत काेविड निर्देशानुसार मंजूलता यांचे पार्थिव मालेगावीच ख्रिश्चन धर्माच्या रिवाजानुसार दफन केले. २२ सप्टंेबरला मंजूलता यांचा काेविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. आपला अंत्यविधी मनमाडलाच व्हावा अशी अंतिम इच्छा त्यांनी मृत्यूपूर्वी मुलगा सुहासकडे व्यक्त केली हाेती. सुहास मनमाड येथील सेतू कार्यालयात कर्मचारी आहे. आईचे ते शब्द वारंवार कानी पडत असल्याने तो बैचेन झाला हाेता. अखेर त्याने आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आधी मालेगावच्या महापालिका आयुक्तांकडे याबाबत विनंती अर्ज केल्यानंतर ६४ दिवसांनंतर म्हणजे २३ नोव्हेंबरला त्यांना याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले. त्यानतंरही प्रशासनासोबत तब्बल ८७ दिवसांची झुंज व कमालीचा मन:स्ताप तिच्या मुलास सहन करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...