आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील देस मोइंस येथे झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत नाशिकचा सुपुत्र असलेल्यारोहित सुभाष पवार या युवकाने बाजी मारीत निर्धारित वेळेच्या तब्बल अडीच तास आधीच पूर्ण करीत स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे,रोहित याचे वडील नाशकातील सातपूर भागातील रहिवासी डॉ. सुभाष पवार यांनी २१ नोव्हेंबर २०२१ मध्येच आयर्नमॅनचा किताब पटकावला असून पिता-पुत्र आयर्नमॅन झाले आहेत.
रविवारी (दि १२) देस मोइंस,अमेरिका येथे आयर्नमॅनची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत किमान १७ तासाची वेळ निर्धारीत केली जाते. या वेळेतच स्पर्धकास चार किलोमीटरची स्वीमिंग ही दोन तासात तर १८० किलोमीटर सायकलिंग ही आठ तास आणि ४२ किलोमीटर धावणे हे सहा तासांच्या वेळ मर्यादेत पूर्ण करण्याचे खडतर आव्हान असते.
या निर्धारित वेळेपूर्वी म्हणजेच तब्बल अडीच तास आधीचरोहित पवारने या तीनही आव्हानांचा सामना करीत किताब जिंकला. स्पर्धेत त्यांनी ४ किमी स्वीमिंग १.२५ तासात, १८० किमी सायकलिंग ६.५२ तासात व ४२ किमी धावणे ५.५० तासात पूर्ण केले. रोहितने वडिलांपासून प्रेरणा घेत या स्पर्धसाठी दोन वर्षांपासासून सराव सुरू केला होता.रोहित हा ३६ वर्षांचा असून त्याने शालेय शिक्षण नाशकातीलच सेंट फ्रान्सिस इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुणे येथील सिंहगड कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनअरिंग पूर्ण केले. अमेरिकेत फ्लोरिडा येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून तो नोकरी करतो. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी व्यायामावर लक्ष केंद्रित करून ही स्पर्धा जिंकत अमेरिकेत नाशिकचे नाव उज्ज्वल केले.
बाप से बेटा सवाई
आयर्नमॅनरोहित पवारचे वडील डॉ. सुभाष पवार हे देखील आयर्नमॅन आहेत. भारतातील सर्वात वयोवृद्ध व जलद वेळेत आयर्नमॅन होण्याचा मान २०२१ ला त्यांनी प्राप्त केला होता. कोझोमेल मॅक्सिकोत १७ तासांची वेळ १५ तास ६ मिनिटात त्यांनी पूर्ण केली होती. दृढनिश्चय व आत्मविश्वास असल्यास निश्चित यशस्वी होता येते हे मीरोहितला दाखवून दिले. त्याने हीच प्रेरणा घेऊन माझे त्यावेळेचे रेकार्ड ब्रेक केल्याने मी खूप आंनदी व समाधानी असल्याचे डॉ. सुभाष पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.