आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे मृत्युदर, मृतांची संख्या हा संवेदनशील विषय बनला आहे. मात्र, त्याशिवायही मृत्यूंच्या कारणमीमांसेत पुरुषांबाबत चिंताजनक बाब पुढे आली आहे. जन्म-मृत्यू नोंदणी संचालनालयाने कोरोनापूर्व काळातील मृत्यूंच्या कारणांचे वर्गीकरण केले आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा धोका अडीच पटीने अधिक असल्याचे आकडेवारीमधून दिसते. २०१९ मध्ये राज्यात २ लाख ६५,१३२ मृत्यू झाले. त्यात १ लाख ७१ हजार ८८३ पुरुषांचे, तर स्त्रियांचे मृत्यू होते फक्त ९३,२४९. त्यानंतर २०२० मध्येही हाच कल दिसतो. कोरोनाचा संसर्ग सुरू झालेल्या या वर्षात राज्यात एकूण ३ लाख ६४,७६० मृत्यू झाले. त्यात पुरुषांची संख्या २ लाख ३४,०६१, तर स्त्रियांची संख्या १ लाख ११,६९९ होती.
हार्मोन्सच्या सुरक्षाकवचामुळे महिलांत हृदयविकारांचे प्रमाण कमी
हार्मोन्सच्या संरक्षणामुळे महिलांत पुरुषांच्या तुलनेत हृदयविकारांचा धोका कमी असतो. तसेच त्यांच्यात धुम्रपानाचे प्रमाणही अत्यल्प आहे. मासिक पाळी गेल्यानंतर हार्मोन्सचे संरक्षण जाते. तरुण महिलांच्या तुलनेत चाळीशीच्या आतील पुरुषांमध्ये हृदयरोगही अधिक आहे, त्यामुळे मृत्यू ओढावण्याचे प्रमाणही अधिक आहे.'- डॉ. अजित भागवत, हृदयविकार तज्ज्ञ
रक्तदाब, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकसारख्या आजारांच्या मृत्यूंमध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत अडीच पटीने अधिक आहे. रक्ताभिसरण, श्वसन व पचनसंस्थेसह मधुमेह, लिव्हर आदी विशिष्ट आजारांमुळे दगावणाऱ्या पुरुषांची संख्याही अधिक आहे.
1 २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये चयापचय संस्थेच्या विकारांमुळे दगावलेल्या पुरुषांची संख्या ५,९१३ ने वाढली, महिलांच्या मृत्यूंमध्ये ३,५६४ ने वाढ झालेली दिसते. 2 मधुमेहाने दगावणाऱ्या पुरुषांची संख्या वर्षात ६,९८० तर स्त्रियांचे मृत्यू ३,७२६ ने वाढले असल्याचे दिसते. 3 रक्ताभिसरण संस्थेच्या आजारांमुळे मृत्यू झालेल्या पुरुषांची संख्या ८,९१४ ने वाढली आहे. तुलनेत महिलांच्या मृत्यूंची संख्या फक्त १,७१३ ने वाढली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.