आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:अवैध धर्मांतरप्रकरणी नाशिकमधील एकासह उत्तर प्रदेशातील दोघे अटकेत

नाशिक2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमधील कथित अवैध धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) रविवारी रात्री नाशिकमधील कुणाल चौधरी उर्फ आतिफ याच्यासह मोहंमद इद्रिस आणि मोहंमद सलीम (दोघेही मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) यांना अटक केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याबाबत स्थानिक पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र कारवाईला दुजोरा दिला. संशयित कुणाल उर्फ आतिश हा नाशिकरोडच्या आनंद नगर भागात मूकबधिर मुले, अपंगांसाठी रुग्णालय चालवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. परदेशातून वेगवेगळ्या खात्यांतून तब्बल २० कोटी रुपये त्याच्या खात्यात आल्याची माहिती असून अद्याप त्याचा तपशिल उपलब्ध नाही.

नोएडा परिसरातील अनेक हिंदू कुटुंबियांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने उघडकीस आणले होते. यामध्ये विशेषत: शारीरिक व्यंग असलेले आणि मूक बधिर अपंगत्व असलेल्या युवकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...