आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार, बसने घेतला पेट

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे गुरुवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास गतिरोधकावर दोन बसच्या धडकेत तीन दुचाकी सापडून त्यानंतर बसला लागलेल्या आगीत २ दुचाकीस्वारांचा जळून कोळसा झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. पेटत्या बसमधील ४३ प्रवाशांच्या बचावासाठी स्थानिक नागरिकांनी धाव घेतल्याने त्यांना जीवदान मिळाले असून २५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर दुचाकींमधील पेट्रोल खाली पडून घर्षणामुळे बसमधील ही इंधनाचा भडका होऊन दुचाकीसह बस पेटली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महामार्गावर चुकीच्या पद्धतीने टाकलेले मोठमोठे गतिरोधक अपघाताला कारणीभूत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रवींद्र सोमनाथ विसे व मदन दिनकर साबळे (दोघेही रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. नगर) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिकजवळील पळसे गावाजवळ घटना, मृत नगर जिल्ह्यातील नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथे गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या अपघातानंतर दुचाकींमधील पेट्रोल खाली पडून घर्षणामुळे बसमधील इंधनाचा भडका उडाला. यामध्ये दुचाकीसह बस पेटून दोघांचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...