आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन व्यावयिकांना घातला गंडा:बीएमडब्लू कार 56% कमी किमतीत देण्याचे आमिष दोन व्यावयिकांना दहा लाखांना गंडा

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएमडब्लू कंपनीमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडंट असल्याचे भासवत बीएमडब्लू कार 2 सिरिज ही गाडी मुळ किमंतीच्या 55 टक्के दराने कमी दरात घेऊन देण्याचे अमिष देत शहरातील दोघा व्यावसायीकांना 10 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयित अमित कुमार घोष या तोतया इसमाच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि चेतन प्रभु रा. शंकरनगर गंगापूररोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 11 एप्रिल रोजी घरी असतांना अनोळखी नंबरहून फोन आला.बीएमडब्लू कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट असल्याचे सांगीतले. साऊथ इस्ट आशियामध्ये गाडी सेल्स करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असे सांगत विश्वास संपादन केले. तुम्ही बीएमडब्लू 2 सिरीज गाडी घेण्याच्या विचारात आहात असे समजले. तुम्ही खरोखर इच्छुत असाल तर 55 टक्के कमी दरात कार मिळवून देतो असे सांगितले. याकरीता आपणास अगाऊ बुकिंग करावी लागेल असे सांगत एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक खाते नंबर दिले. प्रभु हे कार घेण्यास इच्छुकक असल्याने त्यांनी संशयितांनी दिलेल्या खात्यात आरटीजीएस द्वारे 5 लाखांची रक्कम अकाऊंट टू अकाऊंट ट्रान्सफर केली. कार बुकिंग झाल्याबाबत काहीच माहिती मिळत नसल्याने संशययिता फोन केला. मात्र प्रतिसाद दिला नाही. माहिती घेतली असता संशयिताने कुमार दाणा या व्यावसायीकालाही अशाच प्रकारे 4 लाखांची रक्कम खात्यात ऑनलाईन भरण्यास सांगीतले तसेत संशयिताची पत्नी बिपाशा भौमिक हीला 50 हजार आरटीजीएस आणि 50 हजार रोख दिले होते.त्यांचीही फसवणूक झाल्याचे समजले. वरिष्ठ निरिक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

कार घेण्यास इच्छुक होताहेत लक्ष

उत्सव काळात वाहन खरेदी अधिक प्रमाणात होते. या काळात कारबाबत माहिती घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. प्रभू आणि दाणा यांनी बीएमडब्लू कार खरेदी करण्यासाठी कंपनीच्या शो रुम मध्ये आणि आॅनलाईन माहिती घेतली होती.याचा फायदा घेत संशयिताने या दोन ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...