आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये गांजा तस्करी करणारे दोघे जेरबंद:61 किलो गांजासह दोन कार जप्त; गुन्हे शाखा युनिट - 1 ची कारवाई

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आडगावमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट -1च्या पथकाने जाधव मळा मुंबई आग्रारोड येथे ही कारवाई केली. एका गाडीतून दुसऱ्या गाडीत गांजाचे पोते भरत असतांना पथकाने दोघांना अटक केली. रशीद गुलाब मन्सुरी रा. माळी गल्ली पिंपळगाव बसवंत, प्रतीश आनंदा जाधव रा. जाधव मळा आडगाव असे अटक केलेल्या संशयितांचे नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर ट्रक चालकांना गांजा विक्री केला जात असल्याची माहिती पथकाचे विशाल काठे यांना मिळाली. पथकाने जकात नाका परिसरात सापळा रचला. एका कार मधून गांजा वाहतूक होत असल्याने पथकाने संशयित वाहनाचा शोध सुरु केला. जाधव मळा येथे एमएच 46 एक्स 5052 या कार मधून एमएच 02 बीडी 9052 मध्ये दोघे जण पोते ठेवत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने दोघांना ताब्यात घेतले. पोत्यात गांजा असल्याचे समजले. दोघांना पथकाने अटक केली.

14 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त

सरदील या घटनेत दोन कार आणि 61 किलो गांजा असा 14 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधक एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाळ, विष्णू उगले, रवींद्र बागुल, किरण शिरसाठ, प्रवीण कोकाटे, नाझीम पठाण, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, शरद सोनवणे, रामदास भडांगे, कविश्वर खराटे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आडगाव मध्ये गांजा तस्करी

आडगाव परिसरात ट्रक टर्निमिनल, तपोवन, जुना ओझर जकात नाका, प्रिंप्री रोड, या परिसरात ट्रक चालकांना गांजा विक्री केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. दोन महिन्यापुर्वी जुना ओझर जकात नाका येथे एका चहाच्या दुकानाच्या शेजारी नाल्यात गांजाने भरलेले पोते बेवारस स्थितीत आढळून आले होते.याचा शोध अद्याप लागलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...