आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:दोन परीक्षा एकाच दिवशी; एक पुढे ढकलण्याची मागणी

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र व सामाजिकशास्त्र या विषयांच्या परीक्षा येत्या ५ व ७ जुलैला होणार आहे. तसेच याच दिवशी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या उत्तर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या परीक्षार्थींना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ५ व ७ जुलै रोजी असणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बी. पी. एड.च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा एक जुलैपासून सुरू होत आहे. याच दरम्यान, मुक्त विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून ५ व ७ जुलै या दोन दिवशी वाणिज्यविषयक विषयांच्या परीक्षा होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केले आहेत. एकाच दिवशी या दोन्ही परीक्षा येत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुक्त विद्यापीठाने ५ व ७ जुलैला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...