आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन ठार:रिक्षावर झाड कोसळून चालकासह दोन ठार ; नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील अपघात

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील एबीबी व आयटीआय सिग्नलच्या दरम्यान असलेल्या कुक्कुटपालन केंद्रासमोर एका रिक्षावर गुलमोहराचे झाड कोसळले. या घटनेत रिक्षाचालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता हा अपघात घडला. पोपट सोनवणे असे मृत रिक्षाचालकाचे तर शैला शांतीलाल पटणी असे मृत प्रवासी महिलेचे नाव आहे. रिक्षाचालक सोनवणे हे नाशिक शहराकडून सातपूरकडे प्रवाशांनी भरलेली रिक्षा घेऊन जात होते. त्याच वेळी रिक्षावर गुलमोहरचे मोठे झाड कोसळले. या घटनेत दोघेही जागीच ठार झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत रिक्षाचालक आणि प्रवासी रिक्षातच अडकून होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत रिक्षावर कोसळलेले झाड दूर केले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...