आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्कम लंपास:दुचाकीच्या डिक्कीतून दोन लाख रुपये लंपास

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मंगळवारी दुपारी बँकेतून दोन लाख रुपये काढून गाडीच्या डिक्कीत ठेवले असता अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कॅम्प विभागात राहणारे कल्पना देवकर व मधुकर देवकर यांनी छत्रपती शिवाजी चौक येथे असलेल्या महाराष्ट्र बँकेतून दोन लाख रुपये काढून आपल्या दुचाकीच्या (एमएच ४१ बीडी ८११४) डिक्कीत ठेवले.

त्यानंतर महात्मा फुले चौक येथे एका दुकानासमाेर गाडी लावून खरेदी करण्यास गेले असता अज्ञात चोट्यांनी डिक्कीचे कुलूप तोडून दोन लाख रुपयांची रोकड रक्कम लंपास केल्याची घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...