आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्युमन ट्राफिकिंग सेल:शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन अल्पवयीन मुले, दोन तरुणी आणि दोन तरुण बेपत्ता

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून एक अल्पवयीन मुलगी, एक शाळकरी मुलगा, दोन तरुणी आणि दोन तरुण बेपत्ता झाल्याचे मंगळवार दि.14 रोजी उघडकीस आले. पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा आणि बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुले बेपत्ता असल्याने कुटुंबीय चिंतेत आहे. शहर पोलिस आयुक्तालयाचे ह्युमन ट्राफिकिंग सेलकडून या बेपत्तांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिंगाडा तलाव परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी घराजवळील सार्वजनिक शौचालयात गेली असता ती परत आली नाही. जेलरोड परिसरात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलगा बाहेर जाऊन येतो, असे सांगून गेला तो परत आला नाही. पोलिसांनी याप्रकरणी भद्रकाली आणि नाशिक रोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तरुण बेपत्ता होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सावता नगर अंबड येथील प्रल्हाद नाना पाटील (वय 36 ) घरातून कुणास काही न सांगता निघून गेले.

शिवशक्ती चौक येथील राहणारे महेंद्र खंडेराव चव्हाण (वय 32) हे घरी काही न सांगती निघून केले. पंचवटी परिसरात राहणारी पल्लवी सतिश दैतकार (वय 25) ही तरुणी घरात कुणास काही न सांगता निघून गेली. श्रमिक नगर सातपुर परिसरात राहणारी निकिता प्रदिप आहेर (वय 21) ही तरुणी घरी परत आली. याप्रकरणी अंबड सातपूर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

ह्युमन ट्राफिकिंग सेलकडून तपास

बेपत्ता झालेल्या महिला व पुरुषांचा आणि अल्पवयीन मुले मुलींचा मध्यवर्ती गुन्हे शाखा अंतर्गत 'ह्युनमन ट्राफिकिंग' सेल कडून शोध सुरु आहे. आई-वडील रागावले म्हणून मुले घर सोडून गेले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...