आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव:रुग्ण एक नावे दोन; पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवालच निगेटिव्ह

मालेगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसरा पॉझिटिव्ह कोण, प्रशासनाची तारांबळ

(मुजम्मील इनामदार)

नावातील चुकीमुळे आठ दिवसांनी उपचारासाठी दाखल केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला. आता रुग्ण एक व नावे दोन अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. रुग्ण एकच असेल तर तो विनाउपचार निगेटिव्ह आला कसा व रुग्ण दोन असतील तर दुसरा पॉझिटिव्ह कोण याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

सवंदगाव येथील ३० वर्षीय तरुण तपासणीसाठी रुग्णालयात गेला होता. २४ तारखेला त्याचा स्वॅब घेऊन त्याला घरी आराम करण्याचा सल्ला दिला होता. तरुणाचा अहवाल २७ एप्रिलला पॉझिटिव्ह आला. मात्र, रुग्णालयाचे मूळ रजिस्टर व प्राप्त अहवाल यादीतील नावात तसेच आडनावात बदल होता. नावातील चुकीमुळे रुग्णाचा अहवाल आल्यानंतर सात दिवस शोध लागला नाही. दोन्ही यादीत मोबाईल क्रमांक एकच असल्याने त्यावरून स्वॅब दिलेल्या तरुणास मंगळवारी आठव्या दिवशी दाभाडीत दाखल केले होते. त्याची पुन्हा स्वॅब तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला आहे. अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. तरुणाचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह असताना तो विनाउपचार बरा झाला कसा, व नावातील चुकीनुसार २ रुग्ण असल्याचे गृहीत धरले तर पॉझिटिव्ह रुग्ण कोण असे प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, तहसीलदार राजपूत यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...