आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपूर येथे खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील वडील आणि दाेन तरुण मुलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच रविवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास नाशिकराेड परिसरातील दाेघा सख्ख्या भावांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये भालेराव मळा येथील भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एकलहरेराेडवरील दुसरा भाऊ चिंताजनक आहे.
या घटनेमुळे नाशिकराेड परिसरात मृताच्या नातेवाइकांनी रास्ता राेकाे आंदाेलन करतखासगी सावकारावर कारवाईकरण्याची मागणी केली. रात्रीउशिरापर्यंत उपनगर व नाशिकराेडपाेलिस ठाण्यात नातेवाइकांनी गर्दीकेली हाेती. उशिरापर्यंत गुन्हा दाखलकरण्याचे काम सुरू हाेते. रवींद्रनाथकांबळे असे मृताचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकरोड येथे राहणारे जगन्नाथ लक्ष्मण कांबळे व रवींद्रनाथ लक्ष्मण कांबळे हे दोघे सख्खे भाऊ नाशिकरोड येथील एका राजकीय पक्षाशी संबंधित नेत्याच्या भावाकडे कामाला हाेते. दोघे भाऊ या संशयित सावकाराकडे कर्जदारांकडून वसुलीचे काम करत आहे.
या दोघांकडून कर्ज वसूल होत नसल्याने संशयित सावकाराने दोघांना कर्जाची रक्कम फेडण्यासाठी तगादा लावला होता. या जाचाला कंटाळून दोघांनी विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात रवींद्रनाथ याचा मृत्यू झाला. जगन्नाथची प्रकृती चिंताजनक आहे. याविरोधात मृताच्या नातेवाइकांनी संशयित सावकारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरिता बिटकाे चाैकात रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनाने नाशिकरोड पोलिसांची धावपळ उडाली. पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते एेकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तणाव निर्माण झाला.
नातेवाइकांचा आरोप
राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या नेत्याचा भाऊ खासगी सावकारी व्यवसाय करताे. त्याच्या जाचाला कंटाळून व भीतीपाेटी कांबळे बंधुंपैकी एक भाऊ घर साेडून निघून गेला हाेता. नाशिकराेड पाेलिस ठाण्यात याप्रकरणी मिसिंगची तक्रारही दाखल आहे. यानंतरही वसुलीसाठी तगादा सुरूच असल्याने दाेघा भावांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आराेप नातेवाइकांनी केला आहे. राजकीय पक्षाच्या नावाने धमकी देणे, कुटुंबियांना शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे हे प्रकार सुरू होते.
सावकारीचा फास
खासगी सावकारांच्या जाचाने शहरात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. या घटनांवरून खासगी सावकारीचा फास घट्ट आवळत चालल्याचे दिसून येत आहे. याबाबत ठाेस कारवाई संबंधित यंत्रणाकडून हाेण्याची आवश्यकता आहे. सावकारांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास काेणी धजावत नाही.
आतापर्यंत शहरात पाच आत्महत्यांच्या घटना
खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून दांपत्याने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली हाेती. त्यानंतर सातपूर येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकाराने शहरात सावकारीचा पाश घट्ट हाेत चालल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.