आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:एकतर्फी प्रेमातून दोन शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळकरी मुलींचा पाठलाग करत बसमध्ये त्यांचा विनयभंग करणाऱ्या संशयिताच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर शंकर ढोकणे (रा. देवळाली कॅम्प) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी आणि तिची मैत्रिण शालीमार येथून शाळेत जात असतांना एका कपड्याच्या दुकानात कामाला असलेला संशयित हा नेहमी मुलींचा शाळेपर्यंत पाठलाग करतो. मुली शाळेतून आल्यानंतर संशयिताने बसमध्ये पाठलाग करत मुलींचा विनयभंग केला. पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगितला. भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयिताला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...