आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:बालाजी वारीत दोन हजार भाविक

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोविंदा गोविंदा चा जयघोष, डोळ्यांना लागलेली बालाजी दर्शनाची आस अन् चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा भक्तिभाव अशा चैतन्यमय वातावरणात सुमारे दोन हजार भाविकांनी शुक्रवारी (दि. २६) बालाजीची वारी केली. बालाजी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून ‘वारी बालाजीची’ हा उपक्रम राबवला जात आहे.जेहान सर्कल ते बालाजी मंदिरापर्यंत वारी काढली जाते.

श्रावणातील अखेरच्या शुक्रवारी या वर्षाच्या ‘वारी बालाजीची’ उपक्रमाचा समारोप झाला. या वारीला सुमारे दोन हजार नागरिक उपस्थित होते. गोविंदा गोविंदा’चा गजर, शंखनाद करीत वारीत सहभागी झालेल्या भाविकांनी बालाजी मंदिर येथे पाेहाेचले. मंदिरात भजन कार्यक्रम, नामस्मरणात ते तल्लीन झाले. तेथे भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. समारोपाच्या वारीला आयोजकांच्या वतीने भाविकांना प्रेमाची भेट म्हणून पूजा साहित्य किट तसेच तुळस व पाम ट्रीचे रोपटे देण्यात आले. यावेळी शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी योगेश बागड, महेश पितृभक्त, किशोर शिरुडे आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...