आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटनांमध्ये वाढ:अशोकनगरला दुचाकी जाळली; दरोडे, खंडणी, जाळपोळ घटनांमध्ये वाढ

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशोकनगर गुंठेवारी भागात दहशत पसरवण्यासाठी समाजकंटकांकडून मोटारसायकली जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रविवारी मध्यरात्री राधाकृष्णनगर भागात राहणाऱ्या संदीप काशीनाथ देवरे यांची एमएच १५ एवाय ७४६४ या क्रमांकाची मोटारसायकल जाळण्यात आली. तसेच अनिल शिरसाट यांची एमएच १५ इ. डब्ल्यू ७८२० या क्रमांकाची मोटारसायकल चोरून नेली. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून सातपूर पोलिस गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

गुन्हेगारी रोखण्यात सातपूर पोलिसांना अपयश
सातपूर | गुन्हेगारीच्या घटना रोखण्यात सातपूर पोलिस अपयशी ठरत आहेत. परिसरात दिवसाढवळ्या दरोडे टाकण्याचे प्रकार घडत असून गोरगरीब विक्रेत्यांकडून खंडणी गोळ करण्याचे प्रकारही वाढले आहेत. इतकेच नव्हे तर गुन्हेगारांनी दहशत निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या दुचाकींची जाळपोळ सुरू केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सातपूरच्या लाहोटीनगर या भरवस्तीत ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दरोडा पडला होता. या प्रकरणाचा अद्यापही पोलिसांचा तपास शून्य आहे.

यानंतर अशोकनगर भागात एकाच रात्री चार घरफोड्या झाल्या. त्याचाही तपास लागलेला नाही. त्यातच आता हातगाडीधारकांकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्येही भीतीचे वातावरण कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...