आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या धुळ्यातील टोळीला जेरबंद करण्यास मोटार चोरी प्रतिबंधक पथकाला यश आले. पथकाने शहरातील विविध भागात दुचाकीचोरांची माहिती काढून सात संशयितांना अटक केली. या टोळीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोटार चोरी प्रतिबंधक पथक नाशिकरोड परिसरात गस्त करत असताना दुचाकीचोरी करणाऱ्या संशयितांची नावे काढून त्यांचा शोध घेतला.
संशयित हर्षवर्धन सतीश निकम, सूरज कृष्णा महिराळे, भादेश सुभाष ढमढेरे, दिनेश राजाराम झोंबाळ, कचरू सोमनाथ तकपाडे, समीर परवेज खान, सुफियान अब्दुल हमीद खान या संशयितांना धुळे पिंपळद येथून अटक केली. संशयितांकडून नाशिकरोड २ उपनगर १ इंदिरा नगर १ तालुका १ भद्रकाली १ या गुन्ह्यातील ७ दुचाकी हस्तगत केल्या. पथकाचे युवराज पाटील, शमशोद्दीन शेख, विशाल पाटील, मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, मुशरीफ शेख, यश पोतन, सचिन रामराजे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याकडून चाेरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.