आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:यूपीत मित्राच्या लग्नाला गेलेल्या दाेघांचा हाॅटेलमधील गॅस गळतीत हाेरपळून मृत्यू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूरमधील दाेघे उत्तर प्रदेशात मित्राच्या लग्नासाठी गेले हाेते. तेथे हाॅटेलमध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे भाजले हाेते. यातील एकाचा घटनेच्या दिवशीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश सुधाकर दाते (३०) व बादशाह परवेज शेख (२६) अशी त्यांची नावे आहेत.

सातपूर येथील हाॅटेल भाेलेनाथच्या संचालकांच्या मुलाचे लग्न उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे हाेते. या लग्नासाठी सातपूरमधील सात युवक स्काॅर्पिआे या वाहनाने गेले हाेते. ८ तारखेला लग्नसाेहळा आटाेपल्यानंतर ते दर्शनासाठी लखनऊ येथे गेले हाेते. तेथे त्यांनी हाॅटेलचा रूम बुक करून तेथे मुक्काम केला. रात्री हाॅटेलच्या खालीच असलेल्या बिर्याणी काॅर्नर येथे प्रकाश व बादशाह हे दाेघे मित्र बिर्याणी खाण्यासाठी गेले हाेते. उर्वरित पाच मित्र हाॅटेलमधील रूममध्येच हाेते. याचवेळी बिर्याणी काॅर्नरच्या हाॅटेलमध्ये गॅस गळती हाेऊन भीषण आग लागली. यात प्रकाश दाते हा १०० टक्के भाजल्याने त्याचा त्या दिवशीच मृत्यू झाला हाेता. तर बादशाह शेख हा ७० टक्के भाजल्याने त्याच्यावर लखनऊ येथील हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू हाेते.

या घटनेनंतर जखमी बादशाहच्या कुटुंबियांनी तत्काळ लखनऊकडे धाव घेऊन मुलाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रविवारी (दि. १८) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साेमवारी (दि. १९) त्याच्यावर सातपूर येथील रजविया मशिदीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील मयत प्रकाश दाते हा सातपूर परिसरातील बंॅकेत सुरक्षा रक्षकाची नाेकरी करत हाेता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. तर बादशाह शेख हा अविवाहित असून त्याचे वडील परवेझ हे सातपूर परिसरात पान- सुपारीचा हाेलसेलचा व्यवसाय करतात.

बातम्या आणखी आहेत...