आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईडी व सीबीआयने चौकशी केली तर 'अब तेरा क्या होगा कालीया' असे शोले चित्रपटातील डायलाँग म्हणत थेट उद्धव ठाकरेवर किरीट सोमय्या यांनी नाशिकरोड येथील व्यापारी संमेलनात घणाघाती आरोप केला. उद्धव ठाकरे, परबांच्या आर्शिवादाने वाझेने बदल्या, बढत्या आणि वसुली सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारतीय जनता नाशिक शहर व्यापारी आघाडीच्या वतीने नाशिकरोड येथे रविवारी किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या नेत्यावर टीका केली.
मविआने जनतेसोबत लबाडी केली
किरीट सोमय्या म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे राज्यातील जनतेसोबत लबाडी करीत असुन केंद्राने इंधनावरील दर कमी केले तरी राज्य शासन दर कमी करीत नाही. ज्या वेळी दर वाढविले त्यावेळी राज्यशासनाने 16 रुपये एका लिटर मागे कर वाढविले, मात्र 1 रुपया 40 पैसे एवढा कर कमी केला आणि यांचेच कार्यकर्ते हातात बाटल्या घेवुन पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यासाठी आंदोलन करतात, खरे तर उध्दव ठाकरे आणि अजीत पवार हेच दोन्ही खिलाडी असुन ते जनतेची फसवणुक करीत आहे असा आरोपही त्यांनी केला.
बढत्या, बदल्या आणि वसुली
सोमय्या म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्या आर्शिवादाने सचिन वाझे याने बदल्या,बढत्या आणि वसुली सुरु केली होती. आता वाझे हा माफीचा साक्षीदार झाल्याने ठाकरेंचे पितळ उघडे पडणार आबे,
लवकरच भ्रष्टाचार उघडा पडेल
सोमय्या टीका करताना म्हणाले की, अनिल देशमुख, प्रदिप शर्मा, नवाब मलिक, संजय राऊत, रश्मी ठाकरे, श्रीधर पाटणकर,अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांचा भ्र्ष्ट्राचार लवकरच उघड होणार असल्याचे सांगितले.तसेच जीएसटी वाढल्यामुळे देशातील भ्रष्टाचार कमी होत असुन त्यासाठी पंतप्रधान यांना श्रेय जाते असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंगेश पगार, सुशिल अष्टेकर,शशिकांत शेट्टी, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, सतीष कुलकर्णी, गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, मंगेश पगार, सुनिल आडके, शांताराम घंटे, अनिकेत शास्त्री देशपांडे, शरद मोरे, संभाजी मोरुस्कर, अतुल धोंगडे, बापु सापुते,अशोक सातभाई, मंदा फड, अस्लम मनियार,टिंकु खोले, रामदास सदाफुले, मंहेद्र अहिरे, संजय शिरसाठ, राजेंद्र मोरे, जान्हवी बिरारी, कोमल मेहरोलिया, विनोद नाझरे, उदय थोरात, नवनाथ ढगे यांच्यासह आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.