आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवेंनी सांगितला 'तो' किस्सा:उद्धव ठाकरे म्हणाले- फार दिवस विराेधी पक्षातही राहायचे नाही; खुर्ची बसण्यासाठी नको, सतत काम करा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''आम्ही सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली की, विधिमंडळात नक्की या. ते विधिमंडळात व नंतर माझ्या चेंबरमध्ये आले. मी अजून मी या खुर्चीत बसलाे नाही हे मी त्यांना सांगताच ते म्हटले की, या खुर्चीतही बसायचेही नाही. आपल्याला सतत काम करायचे आणि फार दिवस विराेधी पक्षातही राहायचे नाही.'' असा किस्सा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितला.

विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतर औरंगाबादला जाण्यापुर्वी अंबादास दानवे त्र्यंंबकेश्वरला दर्शनासाठी गेले. त्यांचा नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विराेधी पक्षनेता झाल्याबद्दल सत्कार केला. त्यावेळी दानवे बोलत होते.

ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास प्रचंड दांडगा हाेता. थाेडक्यात खुर्चीत बसायचे नाही तर या खुर्चीचा उपयाेग लाेकांमध्ये फिरण्यासाठी करायचा असेही त्यांना सांगायचे हाेते असाही मंत्र दानवे यांनी दिला.

ठाकरेंच्या आग्रहामुळेच....

दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आग्रह केल्यामुळेच मी विधिमंडळात आलो, आता खुर्ची बसण्याची नाही तर फिरण्यासाठी आहे, असे सांगत पदाधिकाऱ्यांना लाेकांची कामे करण्यासाठी तळापर्यंत फिरण्याचा कानमंत्र दिला. ते शिवसेना कार्यालयातील मेळाव्यात बोलत होते.

दानवे म्हणाले, मागील दाेन ते तीन महिने झाेपलाेच नाही. झाेपायचाे अडीच, तीनला, त्यानंतर सकाळी सहाला उठून बाहेर पडायचाे. मात्र परिस्थीतीच अशी आहे की फिरणे गरजेचे आहे. त्यादिवशी उद्धव ठाकरेही विधिमंडळात आले. काही जणांना उगाच वाटू शकते की, ते मुख्यमंत्री हाेते. मात्र, आता नाहीत. पुन्हा ते येतील की नाही हे माहिती नाही. मात्र, आम्ही सांगितले की, ते ठाकरे आहेत. ते मैदानात उतरले की सर्व ठिक हाेणार.

बस्स तुम्ही मैदानात उतरा

दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व आमदारांनी विनंती केल्यानंतरच ते विधीमंडळात आले व याठिकाणी ज्या दिवशी तुम्ही मैदानात उतराला, तेव्हा आपाेआप सर्व गाेष्टी ठिक हाेईल असे सांगितले. त्या दिवशी महाराष्ट्रालाही वेगळे काही सांगण्याची गरज पडणार नाही.

सर्व पदाधिकारीही उपस्थित

आताचे बंदर व गाैन खनिज मंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गाेडसे व आमदार सुहास कांदे यांच्या बंडानंतरही नाशिकची शिवसेना अभेद्य राहीली. आदित्य ठाकरेंच्या दाैऱ्यात सर्व पदाधिकारी झाडून उपस्थित हाेते. दानवे यांच्या दाैऱ्यातही उपनेता सुनील बागुल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते, दत्ता गायकवाड, विलास शिंदे, देवानंद बिरारी आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...