आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र:21 दिवसात तिसऱ्यांदा शिंदे गटाचा धमाका, मनपा निवडणुकीसाठी जोरदार तयारी

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने गेल्या २१ दिवसात तिसऱ्यांदा उदधव ठाकरे गटाला दणका दिला असून शुक्रवारी सकाळी तब्बल चाळीसहून अधिक पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश करीत स्वत:ची तटबंदी मजबूत केली.

सर्वप्रथम अजय बाेरस्ते व ११ माजी नगरसेवकांच्यारूपाने १६ डिसेंबर राेजी उद्धव गटाला दणका दिला. त्यानंतर, विधीमंडळ अधिवेशन सुरू असताना ठाकरे गटासह मनसेला धक्का दिला हाेता. उद्धव गटाचे माजी नगरसेवक शिंदे गटात जातील अशी अटकळ असताना प्रथमच संघटनात्मक हादरा दिला गेला. त्यात प्रामुख्याने पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, शहर संघटक अनिल साळुंखे,महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना महाराष्ट्र उपसचिव बापू लहूजी ताकाटे, नाशिक रोड शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे, उप महानगर प्रमुख योगेश चव्हाणके, अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, युवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमुख रुपेश पालकर, युवसेना नाशिक जिल्हा सरचिटणीस संदेश लवटे, विभाग प्रमुख नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहांके, विनोद नुनसे, शैलेश कार्ले, प्रसन्ना तांबट, अमेय जाधव, सहाय्यक संपर्क प्रमुख पच्छिम विधानसभा, महासचिव विश्व ब्राम्हण यांचा समावेश अाहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व पदाधिकाऱ्यांचा संघटनेत उचित सन्मान राखला जाईल असे आश्वासन दिली असून नाशिकच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे आदेशित केले.

यांनीही केला प्रवेश

महापरिषद ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख महेश जोशी,उप विभाग प्रमुख राहुल देशमुख, प्रशांत गाडगीळ, प्रशांत निचल, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, प्रमोद काशेकर, योगेश धामणस्कर, युवसेना महानगर संघटक गोकुळ मते, युवसेना उप महानगर प्रमुख, पोलीस बॉइज संघटना जिल्हा अध्यक्ष विशाल खैरनार युवसेना पूर्व विधानसभा प्रसिध्द प्रमुख अंकुश बोचरे, युवसेना शहर समन्वयक आकाश काळे, युवसेना विस्तारक सोशल मिडिया राकेश झोरे,युवसेना विभाग प्रमुख मोहित पन्हाळे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, शाखाप्रमुख गणेश परदेशी, राहुल रंधे, अमोल वराडे, अनिल निरभवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर.

आनंद गटकळ, धीरज कडाळे, महाराष्ट्र शिव वाहतुक सेनाचे महाराष्ट्रराज्य सचिव लक्षुमण (नाना) पाटील, नाशिकशहर अध्यक्ष मनोज ऊदावंत, नाशिकजिल्हा प्रमुख आनिल नागरे, नाशिकजिल्हा उपअध्यक्ष संदिप कदम, नाशिकजिल्हा प्रसीध्दीप्रमुख रविद्र पेहेरकर, सिन्नरतालुका अध्यक्ष पंकज भालेराव, सिन्नरतालुका उपअध्यक्ष आनिल शिंदे, नाशिकरोड अध्यक्ष उमेश सोनार आदी.

बातम्या आणखी आहेत...