आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडात नाशिकची भुमिका माेठी दिसून आली. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी व स्थानिकपातळीवरील आपल्या गढीची बांधबंदिस्ती करण्यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मैदानात उतरले आहेत. ठाकरे हे जानेवारीअखेर नाशिकमध्ये येण्याची शक्यता असून नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ‘माताेश्री’वरील भेटीत तसे संकेत दिले आहे.
संजय राऊत नाशिकमध्ये दोन दिवस
उत्तर महाराष्ट्र संपर्कनेता संजय राऊत हेही त्यापुर्वी आवश्यक रणनिती ठरवणे व पक्षबांधणीसाठी येत्या शनिवार व रविवारी नाशिकमध्ये येणार आहेत. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात तात्कालीन कृषीमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे व कालांतराने हेमंत गाेडसे यांनी सहभाग घेतला. मात्र, नाशिक शहरातील शिवसेना अभेद्य हाेती.
नगरसेवक गळाला लागले
प्रवीण तिदमे यांच्यारूपाने शिवसेनेने पहिला माजी नगरसेवक गळाला लावत थेट महानगरप्रमुखपद बहाल केले मात्र त्यानंतर शिंदे गटाला माेठा धक्का देता अाला नव्हता. विशेष म्हणजे, राऊत हे तुरूंगात असताना सर्व घडामाेडी सुरू हाेत्या. राऊत यांची सुटका झाल्यानंतर स्थानिकपातळीवर गटबाजी थांबेल व अविश्वासाचे धुके विरेल अशी अपेक्षा हाेती. प्रत्यक्षात त्यांच्या सुटकेनंतर संभाव्य गटबाजीला खतपाणी मिळाल्यामुळे माजी विराेधी पक्षनेता अजय बाेरस्ते यांच्या नेतृत्वाखाली 11 नगरसेवकांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे नाशिकच्या गढीला जाेरदार हादरा बसला.
चौधरीही शिंदे गटात
अशातच ठाण्यातील रहीवासी मात्र नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरी यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे राऊत यांचीच काेंडी झाली. या घटनेनंतर उद्धव गट काहीसा काेमात गेल्याचे चित्र हाेते मात्र त्यातून बाहेर निघत गेलेल्यांना गद्दार संबाेधत त्यांच्या प्रभागात मेळावे घेणे सुरू केले. पाठाेपाठ बुधवारी मुंबईत जावून माताेश्रीवर ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नाशिकमधील संघटनात्मक स्थिती विषद करण्यात आली. ठाकरे यांनी प्रत्येक बंडखाेरासमाेर सक्षम पर्याय द्या अशाही सुचना दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख नियुक्तीसाठी चाचपणी
शनिवारी व रविवारी राऊत हे दाेन दिवस नाशिकमध्ये तळ ठाेकून संघटनात्मक परिस्थीतीचा आढावा घेतला. संपर्कप्रमुख स्थानिकपातळीवर नियुक्त करायचा की मुंबईतून पाठवायचा याबाबत चाचपणी हाेेणार आहे. तसेच दिंडाेरीचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील हेही चाैधरी यांच्यासमवेत शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्या जागेवर काेणाची नियुक्ती करणार याबाबत खल हाेणार आहे.
बाेरस्तेंच्या विराेधात ठाकरेंची खेळी
मंगळवारी राऊत यांच्या उपस्थितीत मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांचे पुतणे युवराज ठाकरे यांची माताेश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासमवेत भेट घालून दिली. मात्र त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झाल्याचे जाहीर केले गेले नाही. ठाकरे यांना अजय बाेरस्ते यांच्याविराेधात गंगापुरराेड प्रभागात उभे करण्याची रणनिती आहे. दरम्यान, उपनेता बबन घाेलप, सुनील बागुल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विनायक पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.