आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उदगीर साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार करणार, समारोपाला नितीन गडकरी, मान्यवरांना दिली संमेलनाची निमंत्रणे

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देताना बसवराज पाटील. - Divya Marathi
शरद पवार यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण देताना बसवराज पाटील.

उदगीर येथे होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ज्ञानपीठप्राप्त दामाेदर मावझाेना, पं. हृदयनाथ मंगेशकर हेदेखील उपस्थित राहणार आहेत. तर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या साहित्य संमेलनाचा समारोप होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली.

उदगीर येथे २२ ते २४ एप्रिलदरम्यान ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली ९५वे साहित्य संमेलन होत आहे.

फाइव्ह स्टार नाही, मात्र उत्तम व्यवस्था

उदगीर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील म्हणाले की,​ उदयगिरी महाविद्यालयाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त एक वेगळा उत्साह आहे. गाव लहान आहे. मात्र नांदेड, बिदर, लातूर ही गावे जवळ आहेत. आम्ही अगदीच फाइव्ह स्टार नाही, पण येणाऱ्या ३००० लाेकांची राहण्याची चांगली व्यवस्था केली आहे.

लेखक आपल्या घरी
उदगीर तसे लहान शहर. लाेक राहू शकतील अशी फारशी हाॅटेल्स त्या ठिकाणी नसल्याने उदगीरकर नागरिकांनी उत्स्फूर्ततेने “लेखक आपल्या घरी’ ही माेहीम हाती घेतली आहे. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था नागरिक आपल्या घरी चार दिवस करणार आहेत. लेखक-लेखिकांसह काही साहित्य रसिकही त्या ठिकाणी राहणार आहेत.

असे असेल संमेलनाचे स्वरूप

  • ७००प्रेक्षक क्षमतेचे दोन मंडप
  • १५००प्रेक्षक क्षमतेचे दोन मंडप
  • २०००प्रेक्षक क्षमतेचे दोन मंडप
  • ३०००पाहुण्यांची निवास व्यवस्था
  • ७मंडपांची उभारणी
  • ३६एकर जागेत संमेलन
  • २४० स्टाॅल्सधारकांची नोंदणी
  • ३०० स्टाॅल्सचे ग्रंथदालन