आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडकोतील विविध ठिकाणी बॅनर व होर्डिंग्जबाजी ची जणू स्पर्धाच भरली असून महापालिका व पोलिसांचे लक्ष असूनही नसल्यासारखे होत असल्याने प्रसिद्धी बॅनरवर झळकणा-यांचे चांगलेच फावले आहे.
कुणीही उठा आणि कुठेही बॅनर होर्डिंग्ज लावा. मग त्यासाठी पोलीस व मनपा ची परवानगी घ्या किंवा नका घेऊ यांचे काही आधिकारी व कर्मचारी हाताशी धरा आणि आर्थिक देवाण घेवाण करून शहरातील विद्रुपीकरण करत बसा असा जणू पायंडाच पडला आहे. यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघत असून पोलीस आणि मनपा एकमेकांकडे बोट दाखवत तेरी भी चूप मेरी भी चूप असे दुर्दैवी चित्र आहे.
शासनाच्या नियमांना वाटाण्याच्या अक्षदा - शहरात कुठेही होर्डिंग बाजी करताना, बॅनर लावताना शासनाची परवानगी घेणे व त्यांनी नेमणूक दिलेल्या जागेवरच लावणे बंधनकारक असताना राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आगामी निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून कुठेही होल्डिंग बाजी करत आहेत. यामुळे शहर विद्रूपीकरण होत आहेच मात्र वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. या सर्व प्रकाराकडे सिडको विभागीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाचे तसेच पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष असून यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अतिक्रमण विभाग संशयाच्या भोव-यात - सिडकोतील अतिक्रमण विभाग हा नेहमीच संशयाच्या भोव-यात आढळलेला दिसतो. मनपाचे अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या संमतीने जबाबदारपणे अशा परवानगी देतात. आणि याचा त्रास सर्वसामान्यांना होतो. आर्थिक देवांघेवणीतून हे सर्व प्रकार सुरू असून यावर मनपा आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
''कायदा व नियम पाळणे सर्वांचीच जबाबदारी - कायदा व नियम पाळणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून होर्डिंग मुळे शहरे विद्रुपीकरण होत आहे. रस्त्यांच्या किनारी अपघात होतात. शिवाय न्यायालयाच्या निर्णयानुसार होर्डिंग लावण्यास बंदी आहे. लोकप्रतिनिधनिसह सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा.'' - अॅड. विलास देशमाने
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.