आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हास्तरीय क्रिकेटमध्ये ‘बीवायके’ विजेता:19 वर्षांआतील मुलांच्या स्पर्धा, सेंट लाॅरेन्सचा संघ उपविजेता

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या १९ वर्षांआतील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत बीवायके कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात सेंट लाॅरेन्स संघावर मात करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेत १९ महाविद्यालयीन संघ सहभागी झाले होते. बीवायके संघाकडून कर्णधार सारंग धामणे, पारस अहिरे, ध्रुव आयार, निखिल खत्री, कृष्णा कुमारखानिया, कृष्णा जाधव, मयूर बुलाणी, सप्तक भाल्वी आदी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवत विजय संपादन केला. तसेच पुढे जळगाव येथे होणार असलेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला. या यशस्वी खेळाडूंचे गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, संचालक डॉ. दीप्ती देशपांडे, संस्थेच्या व्यवस्थापन विभागाचे शैलेश गोसावी, संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रवीण मुळे, क्रीडा मार्गदर्शक प्रा. डॉ. सुनील मोरे, केंद्रीय समन्वयक समितीचे एफ. बी. दडके, प्रा. कुणाल महाजन, प्रा. सुरेश कोकाटे, सर्वेश देशमुख व जिमखाना विभागाचे अरुण पाकळे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...