आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या विरोधात येथे मंगळवारी (दि. २८) उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर रॅली काढून आंदोलन छेडले.येथील बसस्थानकापासून रॅलीस सुरुवात झाली. रॅली महामार्गावर येताच संतप्त शिवसैनिकांनी लांदाेलन करण्याचा प्रयत्न करून बंडखोर आमदारांच्या विरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. यावेळी पोलिसांनी महामार्गावरून शिवसैनिकांना हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक काही शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचे प्रतीकात्मक पुतळे आणून त्यांचे दहन केले.
यावेळी उपतालुकाप्रमुख राजनसिंह चौधरी, ज्येष्ठ नेते कारभारी आहेर, माजी शहराप्रमुख शरद शेवाळे, मुन्ना सोनवणे, सुनील पाटील, माजी तालुकाप्रमुख अनिल सोनवणे, जब्बार पटेल, लक्ष्मण सोनवणे, दिलीप शेवाळे, बापू कर्डिवाल, सचिन देवरे, युनूस मुल्ला, आनंदा महाले, अशोक लाडे, सुभाष खैरनार, युवराज वाघ, विक्रांत पाटील, राजू जगताप, बाजीराव देवरे, नरेंद्र देवरे, गणेश सोनवणे यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येवल्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको
अडीच वर्षांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देणारे सरकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आल्यानंतर राज्याला प्रगतीपथावर नेणारी कामगिरी महाशक्तीच्या पोटात दुखावल्यानेच बंडखोर आमदारांना हिंदुत्वाच्या नावाखाली फूस लावून नेले, बंडखोरांना शिवसैनिक कदापी माफ करणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांनी दिला. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शहरातील विंचूर चौफुलीवर सुमारे अर्धा तास शिवसेनेने रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली.
बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना भवन ते विंचूर चौफुलीपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. रॅलीचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, आमदार नरेंद्र दराडे, संभाजी पवार, कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, वाल्मीक गोरे यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड, दिलीप मेंगळ, शरद लहरे लादी पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाडला आज रॅली, मात्र फलक काढल्याने उलटसुलट चर्चा मनमाड|एकनिष्ठ शिवसैनिकांनी बुधवारी (दि.२९) शहरातून रॅली काढण्याचा निर्धार केला आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी शहरांतील शिवसैनिकांची बैठक माजी आमदार राजाभाऊ देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष व गटनेते गणेश धात्रक, साईनाथ गिडगे, प्रविण नाईक आदींच्या मार्गदर्शनाखाली झाली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्राथमिक शाळेजवळ बुधवारी निघणाऱ्या रॅली संबंधातील शिवसेनेचा फलक मंगळवारी (दि. २८) अचानक काढून टाकण्यात आल्याने उलटसुलट चर्चा शहरात सुरू होती.
वणी येथेही निदर्शने
बंडखोरांच्या निषेधार्थ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वणी येथे निदर्शने करण्यात आली.कार्यकर्त्यांनी बंडखोर मंत्री आमदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील लादी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.